Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे त्याच मुळे शेती सोबत ते पशुपालन व्यवसाय देखील करतात. काही शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी खुपचं कमी जागा असते त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात जोडधंधा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. परंतु पशुपालन व्यवसाय करत असताना त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामोरे जावे लागते. गाय, म्हैस यांना खायला मोठ्या प्रमाणात हिरवा चाऱ्याची व्यवस्था करावी लागते त्यामुळे त्यांना दिला जाणारा हिरवा चारा हा कापावा लागतो आणि यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात कारण चारा कापण्यासाठी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लातो म्हणून राज्यातील पशुपालकांच्या पशुपालन करताना येणाऱ्या समस्यांचा विचार करून अशा नागरिकांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
गुरांसाठी हिरवा चारा देण्यासाठी चारा कापावा लागतो पण शेतकऱ्यांजवळ चारा कापण्यासाठी कुठल्याच प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याचा कारणामुळे हाथाने चारा कापावा लागतो ज्यामध्ये खूप वेळ लागतो सोबत खुप सारी मेहनत करावी लागते आणि यामुळे काही शेतकऱ्यांना दुखापत सुद्धा होते. शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या खुपचं गरीब असल्यामुळे तो चारा कापण्याची मशीन खरेदी करण्यासाठी सक्षम नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी आवश्यक 2 एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकरी जलद गतीने चारा कापू शकतो आणि त्यामुळे त्याच्या वेळेची आणि कष्टाची बचत होईल.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देते. कडबा कुट्टी मशीन ची किंमत ही साधारणतः 20 हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान सरकारकडून उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील अतिरिक्त रक्कम ही लाभार्थ्यांना स्वतःजवळील भरणे आवश्यक आहे.
योजनेबद्दल माहिती: Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra
योजनेचे नाव- कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र
राज्य- महाराष्ट्र
विभाग- पशुसंवर्धन विभाग
लाभ- 10 हजार रुपये
उद्देश्य- शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थी- राज्यातील शेतकरी व पशुपालक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन/ऑफलाईन
कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना मोफत कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध करून देणे.
शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पशु पालन उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे.
शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देणे.
शेतकऱ्यांना शेती कार्यात आणि पशुपालन कार्यात जलदता निर्माण करून देणे.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे वैशिष्ट्य: Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra
शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानाची आर्थिक रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात DBT च्या सहायाने जमा करण्यात येईल.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे:
मशीनच्या सहाय्याने चारा हा तेज गतीने आणि नासाडी न होता कापता येतो,
यंत्राच्या मदतीने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापता येतो त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे व सहज होते.
शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीन मिळेल अथवा 10 हजार रुपये दिले जातील.
चारा कापण्यासाठी मशीन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना हाताने चारा कापण्याची गरज लागणार नाही त्यामुले त्यांच्या वेळेची आणि कष्टाची बचत होईल.
कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ: Benefits of Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra
या शासकीय योजनेअंतर्गत शेतकरी तसेच पशुपालकांना 2 एचपी विद्युतचलित क्षमतेचे कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये आर्थिक अनुदान दिले जाते.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभ कोणाला मिळणार:
राज्यातील शेतकरी आणि पशुपालक जे पशुपालन व्यवसाय करतात त्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड अशी असेल:
लाभार्थ्यांची निवड करताना या योजनेमध्ये 30 टक्के महिला लाभार्थ्यांचा व 3 टक्के अपंग लाभार्थ्यांचा समावेश केला जाईल.
या योजनेमध्ये आवश्यक पात्रता व अटी, शर्ती खालील असतील:
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे अनिर्वाय आहेत.
अर्जदाराकडे पशु म्हणजेच जनावरे असणे आवश्यक आहे.
फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
अर्जदाराजवळ कमीत कमी 2 जनावरे असणे अनिर्वाय आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक मिळकत 2 लाखांपेक्षा कमी असावी.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थीला मिळालेली कडबा कुट्टी मशीन विकता येणार नाही.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
सदरचे कडबाकुट्टी मशीन हे भारतीय मानक संस्थेच्या प्रमानकानुसार गुणवत्तेचे असावे.
मुंबई व मुंबई उपनगर या कडबा कुट्टी योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.
केंद्र पुरस्कृत वैरण आणि पशुखाद्य कार्यक्रम तसेच, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांना यापुर्वी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा लाभ मिळाला आहे, अशा लाभार्थ्यांना या प्रकल्पामधुन लाभ देता येणार नाही.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- Important Documents For Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra
1) आधार कार्ड
2) रहिवाशी दाखला
3) बँक खात्याचा तपशील
4) मोबाईल नंबर
5) ई-मेल आयडी
6) जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
7) कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे बिल
8) उत्पन्नाचा दाखला
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
अर्जदाराला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर गेल्यावर अर्जदाराला आपल्या User Name आणि Password च्या मदतीने लॉगिन करावे लागेल. जर तुम्ही User Name आणि Password बनवला नसेल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नवीन नोंदणी करावी लागेल.
लॉगिन झाल्यावर तुम्हाला शेती योजना वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांची यादी दिसेल त्यामध्ये तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नंतर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची या कडबा कुट्टी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात अथवा जिल्हा कार्यालयात पशु संवर्धन विभागाला भेट देऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती बरोबर भरून सोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
भरलेला अर्ज नंतर जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची कडबा कुट्टी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.