Swadhar Yojana: स्वाधार योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात दहावी झाल्यानंतर शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे
दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या तसेच तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढच्या शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तिथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना दहावी नंतर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी सरकारने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १०वी / १२वी / पदवी /पदवीका परिक्षेमध्ये ६० % पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. अनुसूचित जाती आणि नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा 50% असेल.
या योजनेनुसार, विद्यार्थ्यांना दर महिन्याला भोजन, निवास तसेच इतर शैक्षणिक खर्चासाठी 2,275/- रुपये ते 4,500/- रुपये पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
🔴 योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत: Benefits of Swadhar Yojana
आर्थिक मदतीमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीस्कर होते.
शिक्षणामुळे रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
समाजात सामाजिक न्याय तसेच समानता निर्माण होण्यास मदत होते.
स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी विविध गोष्टींवर अवलंबून आहे ज्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
🔴 स्वाधार योजनेसाठी पुढील विद्यार्थी पात्र असतील- Eligibility Criteria For Swadhar Yojana
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी स्वाधार योजने साठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौध्द वर्गातील विद्यार्थीं अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
इयत्ता 10वी मध्ये कमीत कमी 60% गुण मिळवलेला विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
दिव्यांग विद्यार्थीं या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी.
दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहे असा विद्यार्थी.
केंद्र किंवा राज्य शासनाच्या एखाद्या योजनेच्या अंतर्गत निर्वाह भत्ता मिळवत नसलेला विद्यार्थी.
शासनमान्य शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे असा विद्यार्थी
🔴 अपात्रता: Disqualification For Swadhar Yojana
आधीच कोणत्याही सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.
व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी या शासकीय योजनेसाठी पात्र नाहीत.
स्वाधार योजना अंतर्गत अर्ज करताना विद्यार्थ्याने आवश्यक असलेल्या पात्रता व अटी यांचे पालन करणे आवश्यक आहे. जर अर्जदार पात्रता, अटी आणि शर्तींचे पालन करत नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल त्यामुळे आम्ही खाली पात्रता, अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
🔴 Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असावा.
अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौध्द वर्गातील असावा.
फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार शासकीय योजनेचा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या स्वाधार योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा तसेच त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थी स्थानिक नसावा म्हणेजच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये कमीत कमी 60% गुण असणे अनिवार्य असेल.
इयत्ता 12वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 12वी इयत्ते मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी कमीत कमी 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.
अर्जदार विद्यार्थ्यांचे वर्षाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरा मध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घरापासुन जवळच्या ठिकाणी शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल आणि निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या सरकारी योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या बँक खात्याशी जोडणे बंधनकारक असेल.
विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यापुढे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
लाभार्थी विद्यार्थ्याने मध्येच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून लगेच बाहेर केले जाईल.
प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे अनिवार्य राहिल.
सदर योजनेचा लाभ हा त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील आणि त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे बंधनकारक आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.
अपूर्ण भरलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज आणि अर्जात खोटी माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
🔴 स्वाधार योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते – Swadhar Yojana Scholarship Amount –
स्वाधार योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी-
भोजन भत्ता (वार्षिक)- 32,000/- रुपये
निवास भत्ता (वार्षिक)- 20,000/- रुपये
निर्वाह भत्ता (वार्षिक)- 8,000/- रुपये
एकूण (वार्षिक)- 60,000/- रुपये
महसूल विभागीय शहर आणि त्याचबरोबर क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी-
भोजन भत्ता (वार्षिक)- 28,000/- रुपये
निवास भत्ता (वार्षिक)- 15,000/- रुपये
निर्वाह भत्ता (वार्षिक)- 8,000/- रुपये
एकूण (वार्षिक)- 51,000/- रुपये
उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी-
भोजन भत्ता (वार्षिक)- 25,000/- रुपये
निवास भत्ता (वार्षिक)- 12,000/- रुपये
निर्वाह भत्ता (वार्षिक)- 6,000/- रुपये
एकूण (वार्षिक)- 43,000/- रुपये
वरील रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील/विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.
विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अर्ज करताना अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणती कागदपत्रे जोडावीत याची कल्पना विद्यार्थ्यांना नसते त्यामुळे स्वाधार योजना कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिलेली आहे.
🔴 स्वाधार योजना कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे- Documents List For Swadhar Yojana
1) अर्जदाराचा फोटो
2) अर्जदाराची सही
3) आधार कार्डाची प्रत
4) जातीचा दाखला
5) बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत अथवा रद्द केलेला चेक.
6) तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारीने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
7) विद्यार्थी निवास करत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
8) महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
9) बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्या संदर्भाचा पुरावा
10) शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC
11) स्थानिक रहिवाशी नसल्या संदर्भाचे प्रमाणपत्र
12) मेस / भोजनालय / खानावळ यांच्या बिलाची पावती
13) उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
14) मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
15) भाडे करारनामा
16) शपथपत्र / हमीपत्र
🔴 रिनिवल (Renewal) अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे- Documents List For Renewal Swadhar Yojana
1) चालू वर्षाच्या बोनाफाईड
2) मागील वर्षाचे गुणपत्रक
3) जातीचा दाखला
4) बँक पासबुक
5) चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6) भाडे करारनामा
7) रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
8) मेस / भोजनालय बिलाची पावती
9) रीनिवल अर्ज सादर करताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही.
🔴 स्वाधार योजनेसाठी कसा करा अर्ज: Apply For Swadhar Yojana
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना https://syn.mahasamajkalyan.in/index.html या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी जवळच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
स्वाधार योजना शासन निर्णय- येथे पाहा
स्वाधार योजना अर्ज- येथे पाहा